
काही महिन्यांपूर्वी लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी इरफानने पत्नी सफाचा चेहरा सर्वांना दाखवला होता. टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाणची पत्नी सफा मिर्झाने सासऱ्यांना एक प्रश्न विचारला.

इरफान पठाण आयपीएलमध्ये कॉमेंटेटर म्हणून काम करतोय. त्यांने मांडलेले मुद्दे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या त्याचा एक व्हिडिओ चर्चेत आहे.

इरफान पठाणची पत्नी सफा बेग सोशल मीडियावर एक्टिव झाली आहे. तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. इरफान पठाणची पत्नी सफा बेग आधी बुर्ख्यामध्येच दिसायची. पण आता ती चेहरा झाकत नाही.

इरफान पठाण या व्हिडिओत वडिल आणि पत्नी सफा बेग सोबत दिसतोय. त्यात त्याची पत्नी सासऱ्यांना काही प्रश्न विचारते. तिने सासऱ्यांना विचारलं, पप्पा सर्वात जास्त चांगली चहा कोण बनवतं? मी की इरफान?.

या प्रश्नावर इरफान पठाणच्य वडिलांनी मुलाची साथ दिली. सफा बेग म्हणाली की, चहाच्या बाबतीत इरफानचच नाव येणार हे मला माहित होतं.