‘चहा’ हा शब्द मराठी आहे का आहे?..99 टक्के लोकांना उत्तर माहित नसेल
'चहा' या पेयाने अखिल भारताची सकाळ होते. मजूर असो की कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी चहाचा घोट घेण्यासाठी कामातून ब्रेक घेतात. हा चहा किंवा चाय हा शब्द कोणत्या भाषेतील आहे याची तुम्हाला कल्पना आहे का ?

चहा पिणाऱ्यांची जगभरात कमी नाही.लोक कोणत्याही ऋतूत चहा पित असतात. अनेकांचं चहा पिल्याशिवाय डोकं चालत नाही. चहाची तलफच अशी जालीम असते. चहाला वेळ काळ नसते. लोक दिवसाची सुरुवातच चहाने करतात. चहाबद्दल एक मजेशीर गोष्ट तुम्हाला माहिती आहे का ?
खरंतर 'चहा' हा शब्द मराठी नाही, तसेच चहाचा शोध देखील भारतात लागलेला नाही,इंग्रजांच्या आधी डचांनी चहाला भारतात आणले. ज्यानंतर चहा हे भारतीयांचं आवडतं पेयं झालं.
मराठीत चहा किंवा हिंदीमध्ये चाय म्हणतो. हे दोन्ही शब्द चीनमधून आले आहेत. चीनमध्ये बोलल्या जाणाऱ्या मंदारिन भाषेतील शब्द आहे. याला चीनमध्ये "Cha (茶)" म्हणतात. कोरिया आणि जपानमध्येही असेच म्हटले गेले.
चहाला पर्शियनमध्ये "Chaye" म्हणतात, ज्याला उर्दूमध्ये चाय म्हणतात. अरबी भाषेत त्याला 'Shay' म्हणतात, रशियन भाषेत 'Chay' म्हणतात, स्वाहिली भाषेत 'Chai' म्हणतात.
चहाला ' Tea' नावाने देखील ओळखलं किंवा बोललं जातं.आश्चर्य म्हणजे 'टी' हा इंग्रजी शब्दही चीनमधून आला आहे. वास्तविक, मिन नान भाषा चीनच्या एका प्रदेशात बोलली जाते, जिथे '茶' चा उच्चार 'te' होतो. येथे व्यवसायासाठी येणारे लोक याला 'टी' म्हणू लागले आणि इतर ठिकाणी त्याला टी म्हटले जाऊ लागले.
चहा पत्ती भारतात जमीनीच्या मार्गाने आल्याने 'चहा' किंवा 'चाय' झाला! मात्र, तो समुद्री मार्गाने जेथे गेला तेथे त्याला 'टे' किंवा 'टी' म्हटले जाते.चहा मुळात डच व्यापाऱ्यांनी भारतात आणला. परंतू 'चा' आणि 'टे' हे दोन्ही शब्द चायनीज भाषेतील आहेत.
भारतीय पुरातन रेशीम मार्ग हा 14 व्या शतकापर्यंत आशियापासून भूमध्यसागरापर्यंत पसरलेला होता. या जमिनीमार्गावर (चीन, भारत, पर्शिया, अरबस्तान, ग्रीस आणि इटली ) जेथे चहा पोहचला तेथे त्याला 'चहा' किंवा 'चाय' म्हटले जाते.
नंतर समुद्री मार्गाने व्यापार सुरू झाल्यावर डचांनी समुद्री मार्गाने चहाची निर्यात सुरू केली. समुद्री मार्गाने जेथे चहा गेला तेथे त्याला 'टे' किंवा 'टी' म्हटले गेले.चहाला रशियन, पर्शियन, अरेबियन आणि स्वाहिली भाषेत चायच म्हणतात बरं का !