
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 4 ते 5 डिसेंबर 2025 दरम्यान भारत दौऱ्यावर आहेत. पुतिन यांच्या भेटीदरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुतिन यांचा आलिशान किल्ला, मोठे खाजगी जेट, मोठी नौका, महागडी घड्याळे आणि अगदी एक घोस्ट ट्रेन हे सर्व बातम्यांमध्ये चर्चेचा विषय आहे.

घोस्ट हा शब्द ऐकताच मनात येणारी पहिली गोष्ट म्हणजे भूतिया ट्रेन किंवा झपाटलेली ट्रेन. पुतिन यांच्या घोस्ट ट्रेनमध्ये खरोखरच भूत आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. नक्की या ट्रेनचे काय सत्य आहे जाणून घेऊयात.

सर्वप्रथम, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या घोस्ट ट्रेनमध्ये कोणत्याही भूतांचा वावर नाही. ही एक गुप्त, चिलखती, खाजगी ट्रेन आहे. तसेच कोणीही त्या ट्रेनला ट्रॅक करू शकत नाही. अहवालांनुसार त्यात जिम, स्पा, कॉस्मेटोलॉजी सेंटर आणि इतर अनेक आलिशान सुविधा आहेत.पुतिन यांच्या ट्रेनला तिच्या रहस्यमयी आणि गुप्त स्वरुपामुळे 'घोस्ट ट्रेन' असे नाव देण्यात आले आहे. या ट्रेनचे कोणतेही औपचारिक नाव नाही.

सर्वप्रथम, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या घोस्ट ट्रेनमध्ये कोणत्याही भूतांचा वावर नाही. ही एक गुप्त, चिलखती, ट्रॅकशिवाय चालणारी खाजगी ट्रेन आहे. अहवालांनुसार त्यात जिम, स्पा, कॉस्मेटोलॉजी सेंटर आणि इतर अनेक आलिशान सुविधा आहेत.पुतिन यांच्या ट्रेनला तिच्या रहस्यमयी आणि गुप्त स्वरुपामुळे 'घोस्ट ट्रेन' असे नाव देण्यात आले आहे. या ट्रेनचे कोणतेही औपचारिक नाव नाही.

पुतिन या ट्रेनने देशांतर्गत प्रवास करण्यास प्राधान्य देतात असे म्हटले जाते. या ट्रेनमध्ये 20 हून अधिक डबे, एक लक्झरी स्पा आणि बरेच काही आहे. झिरकॉन सर्व्हिस या रशियन कंपनीच्या लीक झालेल्या कागदपत्रांमधून ही माहिती उघड झाली आहे.ही एक अतिशय गुप्त, पूर्णपणे बख्तरबंद ट्रेन आहे जी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन त्यांच्या प्रवासासाठी वापरत असत, प्रामुख्याने विमान प्रवास टाळण्यासाठी आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी.

पुतिन ही ट्रेन वापरतात हे संपूर्ण जगाला माहीत आहे. रशियन सरकारने स्वतः ट्रेनच्या भव्य सजवलेल्या बोर्डरूममध्ये झालेल्या बैठकांचे फोटो वारंवार प्रसिद्ध केले आहेत. तथापि, रशियन सरकारने ट्रेनच्या उर्वरित 20 डब्यांमध्ये काय आहे याचे गुपित काळजीपूर्वक जपले आहे.