
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाला जान्हवी कपूर डेट करत आहे. नेहमीच जान्हवी आणि शिखर पहाडिया हे स्पाॅट होताना दिसतात. त्यांच्या लग्नाचीही जोरदार चर्चा रंगताना कायमच दिसते.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर हे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जाते. अंबानींच्या पार्टीमधील यांचे काही फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले.

आता नुकताच सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ हे तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी बोनी कपूर यांनी असे काही केले की, सर्वजण हैराण झाले. विमानतळावर बोनी कपूर हे पापाराझी यांना फोटोसाठी पोझ देताना दिसले.

त्यावेळी मागून तिथे शिखर पहाडिया हा पोहचला. पापाराझी हे बोनी कपूर आणि शिखर पहाडिया यांना फोटोसाठी एकसोबत पोझ देण्यास सांगतात. यावेळी थेट शिखर पहाडिया याच्यासोबत फोटोसाठी पोझ देण्यास बोनी कपूर नकार देतात. थेट त्याचे फोटो घेऊ नका हेच बोनी कपूर सांगतात.

बोनी कपूर हे फोटोसाठी पोझ देताना दिसत असून शिखर पहाडिया तिथून निघून जातो. आता या प्रकारानंतर विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. एकाने तर थेट म्हटले की, शिखर पहाडिया बोनी कपूरला जावई म्हणून आवडत नाही वाटत.