
'हाऊसफुल 5' या चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अध्यात्म आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याला प्राधान्य देत आहे.

यासाठी जॅकलिन अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या बंगळुरू इथल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आश्रमात पोहोचली आहे. याठिकाणी तिने निसर्गाच्या सानिध्यात आणि प्राण्यांसोबत निवांत वेळ घालवला.

जॅकलिनने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत कृतज्ञता व्यक्त केली. 'माझं हृदय प्रेमाने भरलंय. धन्यवाद गुरूदेव.. मला मार्ग दाखवण्यासाठी. मी तुमची आभारी आहे', असं तिने लिहिलंय.

जॅकलिनने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये ती बछड्यांसोबत खेळताना, त्यांना लाड-प्रेम करताना, कुरवाळताना दिसून आली. गोशाळेत तिने बराच वेळ घालवला. यावेळी जॅकलिनच्या साध्या लूकनेही नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं.

चित्रपटांमध्ये नेहमीच ग्लॅमरस अंदाजात दिसणारी जॅकलिन या आश्रमात मात्र अत्यंत साधेपणानं राहू लागली. तिने याठिकाणी घोडेस्वारीचाही आनंद घेतला.

जॅकलिनचं कौतुक करत नेटकऱ्यांनी लिहिलं, कितीही परदेशात फिरलात तरी अखेर निसर्ग आणि प्राण्यांच्या सानिध्यातच खरा आनंद मिळतो.

यावेळी श्री श्री रविशंकर यांच्याकडून तिला विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन मिळालं.