
कलर्स मराठी वाहिनीवरील 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत दोन सख्ख्या भावांची गोष्ट पहायला मिळणार आहे. थोरला भाऊ वासुदेव आणि लहान यशोधन. यांच्या आयुष्यातील संघर्ष, नात्यांतील तणाव, आणि अहंकाराच्या लढाईत स्वामींच्या लीलांची अद्भुत गुंफण पाहायला मिळते.

वासुदेव कर्तृत्ववान आणि स्वाभिमानी, तर यशोधन, आईच्या प्रेमात गुरफटलेला आणि तब्येतीमुळे दुबळा. या दोन भावांमधील विरोधाभास आणि त्यांच्या कुटुंबातील नाजूक नाती हा कथेचा गाभा आहे.

स्वामी आपल्या लीलांनी या कुटुंबावर कसा प्रभाव टाकतात, कसे बदल आणि समर्पण यांचे सत्य कसे उलगडतात, आणि अहंकाराच्या अंधारातून सत्याच्या प्रकाशाकडे कसा प्रवास घडवतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

वासुदेवचा 'मीच सर्वकाही' हा सूक्ष्म अहंकार आणि स्वामींचे 'बदल हेच चिरंतन' हे तत्वज्ञान यांच्यातील संघर्ष ही या कथेची खासियत आहे. 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेतील स्वामी लीलांची अलौकिक गोष्ट सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता कलर्स मराठीवर पहायला मिळणार आहे.

स्वामींच्या लीलांमधून मिळणारे जीवनाचे धडे, भावनांचे कंगोरे, आणि अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातील सीमारेषा दाखवणारी ही कथा प्रेक्षकांना नक्कीच भावूक करेल. वासुदेव आणि यशोधन यांच्या नात्यातील चढ-उतार आणि स्वामींच्या कृपेमुळे त्यांच्या आयुष्यात घडणारे बदल यांचा प्रवास अनुभवण्यासाठी सज्ज व्हा.