
दृश्यम फ्रेंचायजी आपला तिसरा पार्ट घेऊन येणार आहे. पुढच्यावर्षी चित्रपट रिलीज होईल. हा चित्रपट पडद्यावर येण्याआधीपासून याची भरपूर क्रेझ आहे. या चित्रपटाच्या पहिले दोन पार्ट्सच्या यशानंतर दृश्यम 3 साठी फॅन्स खूप एक्सायटेड आहेत.

दृश्यम 3 चर्चेत येण्यामागे कारण आहे अक्षय खन्ना. या चित्रपटात आधी अक्षय खन्ना होता. पण आता त्यांची जागा दुसऱ्या अभिनेत्याने घेतली आहे. कारण धुरंधर हिट झाल्यानंतर अक्षय खन्नाच्या फि मध्ये मोठी वाढ झाली आहे. ती निर्मात्यांना परवडत नाहीय.

दृश्यम 2 मध्ये दिसलेल्या अक्षय खन्नाने दृश्यम 3 साठी मेकर्सकडे 21 कोटींची मागणी केली आहे. अक्षयची ही मागणी मान्य झाली नाही. त्याला चित्रपटातून बाहेर करण्याचा निर्णय झाला. धुरंधर हिट होताच अक्षय खन्नाच्या फि मध्ये सुद्धा वाढ झाली आहे.

दृश्यम 3 मध्ये अक्षय खन्नाच्या जागी आता जयदीप अहलावत दिसणार आहे. जयदीप दृश्यम 3 साठी जानेवारी 2026 मध्ये शूटिंग सुरु करणार आहे. त्याला एका महत्वाच्या रोलसाठी कास्ट केलय. त्यामुळे स्टोरीमध्ये टि्वस्ट येईल.

जयदीप अहलावत आणि अजय देवगण यांची स्क्रिन शेअर करण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी 2010 मध्ये रिलीज झालेल्या आक्रोश चित्रपटात जयदीप अहलावत आणि अजय देवगण एकत्र दिसले होते.