Photo : अपघातानंतर गॅस टँकरला भीषण आग, चालकासह दोघांचा मृत्यू, जळगाव हादरलं

Gas Tanker Accident : जळगावच्या सबगव्हाण टोल नाक्यावर अपघातानंतर गॅस टँकरला भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.

बापू गायकवाड | Updated on: Jul 04, 2026 | 9:51 PM
1 / 5
जळगावच्या पारोळा-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सबगव्हाण टोल नाक्यावर गॅस टँकरचा भीषण अपघात झाला आहे. यानंतर गॅस टँकरला भीषण आग लागली.

जळगावच्या पारोळा-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सबगव्हाण टोल नाक्यावर गॅस टँकरचा भीषण अपघात झाला आहे. यानंतर गॅस टँकरला भीषण आग लागली.

2 / 5

गॅस टँकरने टोलनाक्यावरील दुसऱ्या वाहनाला जोरदार धडक दिल्यानंतर टँकरने घेतला पेट घेतला. या अपघातात टँकरमधील चालक व क्लीनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

3 / 5

हा अपघात एवढा जोरदार होता की टँकरचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी तातडीने दाखल झालेल्या अग्निशमन बंबाने तब्बल दोन तासांच्या प्रयत्ननंतर आग आटोक्यात आणली.

4 / 5

तातडीने आगीवर नियंत्रण मिळवल्याने गॅस टँकरचा स्पोट होण्याची मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र अपघातामुळे व गॅस टँकरला लागलेल्या आगीमुळे सुमारे दोन ते तीन तास महामार्गावरील दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती.

5 / 5

अपघातानंतर गॅस टँकरला आग लागल्याने भीतीचे वातावरण पसरले होते, आजूबाजूच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला होता, मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us