
जळगाव जिल्ह्यातील रावेर, उत्तर भारतात अधिक व श्रावण मासानिमित्त आधीच केळीची मागणी वाढली होती. त्यातचं आता आपल्याकडेही श्रावणमास सुरू झाल्याने केळी भावातही तेजी आली असल्याचं शेतकरी सांगत आहेत.

क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयांची वाढ झाल्याने सध्या केळीला प्रतिक्विंटल १५०० ते १८०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.

रावेर तालुक्यात उन्हाळ्यात 'केळीबागांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली होती. दुसरीकडे पावसाळ्याच्या तोंडावर सुमारे दोन-अडीच हजार हेक्टर क्षेत्रातील केळीबागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे केळी पट्ट्यातून केळीचं उत्पादन कमी आहे.

वादळी वाऱ्यासोबत झालेल्या पावसामुळे केळीच्या अनेक पुर्णपणे उद्धवस्त झाल्या होत्या. त्यामुळे केळी बाजारात कमी प्रमाणात दाखल होईल अशी शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती.