
Jalgaon Gold And Silver Sarafa Bazar : जळगावच्या सराफा बाजारात दिवाळीच्या पूर्वसंध्येला सोने आणि चांदीने मोठी भरारी घेतली. सोन्याने एक लाख 32 हजारांचा टप्पा ओलांडला होता. तर चांदीने दोन लाखांकडे धाव घेतली होती. आता मात्र दोन्ही धातुंचे आवसान गळाले आहे.

जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे

एकाच दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 4 हजार 700 रुपये तर चांदीमध्ये तब्बल 7 हजार रूपयांची घसरण झाली आहे

सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 20 हजार 510 रुपयांवर पोहोचले आहे, 1 लाख 48 कोटी 320 रुपयांवर आले आहे

महिनाभरातील आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण असून जळगावच्या सराफा दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे

दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याचे 1 लाख 35 हजार रुपयांच्या विक्रमी उच्चांकी वर पोहोचले होते.

सोन्या आणि चांदीच्या घरामध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे

अमेरिका आणि चीन यांच्यात समझोता करार होणार असल्याचे शक्यतेमुळे त्याचा परिणाम जळगावात सोन्या आणि चांदीच्या दरावर झाल्याचं सराफ व्यावसायिक यांचं म्हणणं आहे.

घसरण ही तात्पुरती असून पुढच्या काळामध्ये सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज देखील सराफ व्यावसायिक यांनी व्यक्त केला आहे

आगामी काळामध्ये तुलसी विवाहनंतर घरात लग्न असलेल्या मंडळीसाठी देखील मोठा दिलासादायक बाब आहे..