
सोन्याच्या दरात एका दिवसात 1300 रुपयांनी वधारले. जळगावच्या सराफ बाजारात इतिहासात पहिल्यांदाच सोने 92 हजार रुपयांवर पोहोचले आहे. जीएसटीसह सोन्याचे दर हे 92 हजारांवर पोहोचले आहे.

चांदीच्या दरात 1 हजारांनी वाढ झाली असून चांदीचे दर 1 लाख 5 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांचा हिरमोड झाला आहे.

ट्रम्प यांचं टेरीफ संदर्भातील धोरण, अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेले ट्रेड वॉर, तसेच जागतिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी या सर्व गोष्टींचा सोन्याच्या दरावर परिणाम झाला आहे.

दोन दिवसांवर गुढीपाडवा असून मुहूर्तावर सोना खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांचा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे खरेदीसाठी हिरमोड झाला आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत ग्राहकांचा काहीसा कमी प्रतिसाद दिसून येत असून सुवर्ण नगरीमध्ये शुकशुकाट दिसत आहे.

सोन्याच्या दरात 700 रूपयांची वाढ झाली असून सोन्याचे दर जीएसटीसह 98 हजार 160 रुपयांवर पोहोचले आहेत.

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 88,417, 23 कॅरेट 88,063, 22 कॅरेट सोने 80,990 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 66,313 रुपये, 14 कॅरेट सोने 51,724 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 99,775 रुपये इतका झाला.