
या आठवड्यात सोने आणि चांदीने मोठी झेप घेतली. सोने आणि चांदीने महागाईचा उच्चांक मोडला. जानेवारीपासून ते मार्चपर्यंत दोन्ही धातुनी मोठा पल्ला गाठला. दोन्ही धातुनी या तीन दिवसात नवीन रेकॉर्ड नावावर नोंदवला आहे.

जळगावच्या सराफ बाजारात अडीच महिन्यातच सोन्याचे दराने मोठी उच्चांकी गाठली आहे. अडीच महिन्यात काळात सोन्याच्या दरात तब्बल 16 हजारांनी वाढ झाली आहे.

जानेवारी महिन्यात सोन्याचा भाव हा 75 हजार रुपये होता. आज सोन्याचा दर 90 हजार 600 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांगलीच चांदी झाली आहे. त्यांना तोळ्यामागे घसघशीत फायदा झाला.

चांदीच्या दराने सुद्धा एक लाखांचा आकडा पार केला आहे. जीएसटीसह आजचे सोन्याचे दर 90 हजार 600 तर चांदीचे दर 1 लाख 4 हजार एवढे आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वेगवेगळ्या पॉलिसी तसेच रशिया युक्रेन युद्ध व आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी ही सोन्याचे दर वाढीमागचे कारणे असल्याचे सराफ व्यावसायिक यांचे म्हणणे आहे.

पुढील काळात सोन्याचे दर 95 हजारांचा आकडा पार करेल असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. तर चांदी सुद्धा मोठी झेप घेणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.