
जळगाच्या सराफ बाजारात गेल्या चार दिवसांपासून भाववाढ होत असलेल्या सोने भावात सोमवारी (२५ नोव्हेंबर) मोठी घसरण झाली. सोने भाव एक हजार ३०० रुपयांनी कमी होऊन ७७ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहेत.

चांदीदेखील एक हजार २०० रुपयांनी कमी होऊन ९० हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली आहे. ऐन लग्न सराईत सोने भावात मोठी घसरण झाल्याने वर वधूकडील वर्हाडी मंडळींना मोठा दिलासा मिळाला आहे

मध्यंतरी घसरण झालेल्या सोने भावात चार दिवसांपासून वाढ होत गेली. यामध्ये २१ नोव्हेंबर रोजी ७७ हजार ७०० रुपयांवर सोने गेले. सोन्याचे दर एक हजार ३०० रुपयांनी कमी होऊन ७७ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले.

दुसरीकडे चांदीचे भाव तर कमी-कमी होत आहेत. यामध्ये २१ नोव्हेंबर रोजी ९३ हजार रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात २२ रोजी एक हजार, २३ रोजी ३०० रुपयांची घसरण होऊन ती ९१ हजार ७०० रुपये प्रति किलोवर आली. सोमवारी तर थेट एक हजार २०० रुपयांची घसरण झाली व चांदी भाव ९० हजार ५०० रुपयांवर आले.

तर सोन्याचा भावा २२ नोव्हेंबर रोजी ८०० रुपये, २३ रोजी ४०० रुपयांची वाढ होऊन सोने ७८ हजार ९०० रुपयांवर पोहोचले होते. रविवारी हाच भाव कायम होता.

सोने-चांदीत स्वस्ताई