AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: पाकिस्तानी खेळाडूंसोबत वैभव सूर्यवंशी आणि टीम थांबली! कारण की…

ICC U19 World Cup 2026: अंडर 19 वनडे वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर सिक्स फेरीचे सामने सुरू आहेत. या फेरीतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. पण नाईलाजास्तव भारतीय संघाला पाकिस्तानसोबत एकाच हॉटेलमध्ये थांबावं लागतं आहे. त्याला कारणही तसंच आहे.

IND vs PAK: पाकिस्तानी खेळाडूंसोबत वैभव सूर्यवंशी आणि टीम थांबली! कारण की...
पाकिस्तानी खेळाडूंसोबत वैभव सूर्यवंशी आणि टीम थांबली! कारण की...Image Credit source: Getty Images
| Updated on: Jan 29, 2026 | 7:38 PM
Share

India vs Pakistan ICC U19 World Cup 2026: आयसीसी अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी चुरस वाढली आहे. त्यामुळे कोणते चार संघ उपांत्य फेरी गाठतात याची उत्सुकता आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामन्याची रंगत वाढली आहे. अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 1 फेब्रुवारी 2026 रोजी भारत पाकिस्तान सामना होत आहे. हा सामना भारतापेक्षा पाकिस्तानसाठी खूपच महत्त्वाचा आहे. पाकिस्तानला दोन गुण आणि नेट रनरेटचं गणित देखील सोडवायचं आहे. त्या तुलनेत भारताचं गणित सोपं आहे. भारताने हा सामना जिंकला काय आणि हरला काय? तरी फरक पडणार नाही, असं चित्र आहे. हा सामना झिम्बाब्वेच्या बुलावायोच्या क्वींस स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जाणार आहे.

भारत पाकिस्तान देशात आणि संघात विस्तवही जात नाही. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याने भारताने बोलणं सोडा, हँडशेकही करणंही टाळलं आहे. त्यामुळे या सामन्यातही असंच चित्र असेल यात काही शंका नाही. पण या सामन्यापूर्वी चित्र काही वेगळं आहे. स्पर्धेच्या व्यस्त वेळापत्रकामुळे क्वींस स्पोर्ट्स क्लबमध्ये सरावासाठी स्लॉट उपलब्ध नाही. त्यामुळे दोन्ही संघांना बुलावायोच्या एथलेटिक क्लबमध्ये एकत्र सराव करावा लागत आहे. सराव मैदानच नाही तर एकाच हॉटेलमध्ये थांबवण्याची वेळ आली आहे.

स्पर्धेत अनेक सामने एकाच वेळी होत आहेत. त्यामुळे सुविधांचा अभाव दिसून येत आहे. इच्छा नसताना दोन्ही संघांना एकत्र वेळ घालावावा लागत आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये दोन्ही संघ वेगवेगळा सराव करतात. पण यावेळी सराव शिबिरात दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात एकत्र दिसले. असं असलं तरी दोन्ही संघांनी एकाच मैदानात वेगवेगळा सराव केला.

भारताने आतापर्यंत स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. साखळी फेरीतील तिन्ही सामन्यात विजय मिळवला होता. तर सुपर 6 फेरीत झिम्बाव्बेचा 204 धावांनी धुव्वा उडवून नेट रनरेट जबरदस्त केला आहे. त्यामुळे भारताचं उपांत्य फेरी खेळण्याचं गणित सोपं झालं आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.