त्यानं लाल दिव्याचं जाळं टाकलं, त्या फसत गेल्या; हादरवून टाकणारा कांड समोर!

सध्या संपूर्ण महाराष्ट्राला थक्क करणारे एक प्रकरण समोर आले आहे. क्लासवन ऑफिसर असल्याचे सांगून एका भामट्याने अनेक तरुणींना फसवले आहे.

| Updated on: Jul 19, 2025 | 6:41 PM
1 / 7
जळगावच्या धरणगाव येथील एका तरुणाने नायब तहसीलदार, क्लास वन ऑफिसर असल्याचे सांगून लग्नाच्या नावाने अनेक तरुणींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

2 / 7
धरणगाव येथील निनाद विनोद कापुरे असे तरुणींची फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.  मॅट्रिमोनियल साइटवरून तरुणींचे संपर्क क्रमांक मिळवून त्याने फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

3 / 7
तरुण जळगाव जिल्ह्यातील असल्याने याप्रकरणी नाशिक व फलटणच्या तरुणींनी जळगावात पोलिस अधीक्षकांना भेटून लेखी तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे. वेगवेगळ्या बहाण्याने तरुणींकडून एकूण 15 लाख उकळून तरुणाने फसवणूक केल्याचेदेखील समोर आले आहे.

4 / 7
सरकारी लाल दिव्याच्या वाहनातील तसेच तहसीलदारांच्या खुर्चीवर बसलेले फोटो पाठवून अधिकारी असल्याचे सांगत तरुणाने विश्वास संपादन केल्याचे तरुणींनी बोलताना सांगितले. तरुणाचे लग्नदेखील झाले असून त्याच्या पत्नीने घटस्फोटाबाबत नाशिक न्यायालयात खटला दाखल केलेला आहे. नाशिक येथे जाऊन माहिती घेतल्यावर ही बाब समोर आल्याचे तरुणींनी बोलताना सांगितले.

5 / 7
पोस्टिंग करावयाची असल्याचा बहाणा करून दोन तरुणींकडून अनुक्रमे 7 लाख व 8 लाख रुपये असे एकूण 15 लाख उकळून तरुणाने फसवणूक केल्याचेदेखील तरुणींनी बोलताना सांगितले. तरुणाचे सर्व फोटो व पैशाचे पुरावे दोन्ही तरुणींनी जळगावात पोलीस अधीक्षकांकडे सादर केले आहेत. या भामट्याने आतापर्यंत अशाच प्रकारे सहा तरुणींना फसवले अशी माहिती समोर आली आहे.

6 / 7
त्यामुळे त्याला अटक व्हावी, उकळलेली रक्कम परत मिळावी व भविष्यात आणखी तरुणींची फसवणूक होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तरुणींनी केलेल्या तक्रारीची जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गंभीर दखल घेतली आहे.

7 / 7
निनाद विनोद कापुरे याच्याविरुद्ध राज्यात इतरही जिल्ह्यात गुन्हे दाखल असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे.