
मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या सरसकट कुणबी प्रमाणपत्रावर ओबीसी समाजाने आक्षेप घेतला आहे. त्यासाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे.

जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये आज ओबीसी समाजाकडून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. ओबीसी समाजाकडून आरक्षण बचाव एल्गार महासभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

एल्गार महासभेसाठी येणाऱ्या ओबीसी बांधवांसाठी जेवणाची खास सोय करण्यात आली आहे. 30 क्विंटल खिचडी शिजवण्यात येत आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या हजारो बांधवांसाठी खिचडी देण्यात येणार आहे. 30 क्विंटल खिचडी आणि जवळपास ट्रकभर पाण्याच्या पाकिटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोठमोठ्या पातेल्यांमध्ये ही खिचडी शिजवण्यात येत आहे. अंबडमधल्या ओबीसी समाजातर्फे ही जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.