
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने इतिहास रचला आहे. ट्रेंट ब्रिज कसोटीत या वेगवान गोलंदाजाने टॉम लॅथमला आऊट करुन एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला. अँडरसनने 650 विकेट पूर्ण केल्या आहेत. तो 650 विकेट घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये जेम्स अँडरसन तिसऱ्या स्थानावर आहे. अँडरसनच्या पुढे शेन वॉर्न आणि मुथय्या मुरलीधरन आहे. मुरलीधरनने कसोटीमध्ये 800 आणि शेन वॉर्नने 708 विकेट घेतल्या आहेत.

जेम्स अँडरसननंतर कसोटीमध्ये सर्वाधिक 563 विकेट ग्लेन मॅग्राथच्या नावावर आहेत. मॅग्राथचा हा रेकॉर्ड इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड मोडू शकतो. त्याने 543 विकेट घेतल्या आहेत.

जेम्स अँडरसन सर्वाधिक कसोटी खेळणारा गोलंदाज आहे. तो 171 वा कसोटी सामना खेळतोय. अँडरसनने आपल्या कसोटी करीयरमध्ये जवळपास 37,००० चेंडू टाकलेत. एकाडावात पाच विकेट घेण्याचा कारनामा त्याने 31 वेळा केला आहे. कसोटीत 10 विकेट घेण्याचा कारनामा त्याने 3 वेळा केला आहे.

जेम्स अँडरसन इंग्लंडकडून 400, 500, 600 आणि 650 विकेट घेणारा पहिला गोलंदाज आहे. अलीकडेच एशेस मालिका संपल्यानंतर अँडरसनला संघाबाहेर करण्यात आलं होतं. पण स्टोक्सने नेतृत्व स्वीकारताच अँडरसनचा कसोटी संघात समावेश झाला.