Omar Abdullah-Nidhi Razdan : मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला पत्रकार निधी राजदान यांच्या डोळ्यात हरवून गेले, दुसऱ्या लग्नानंतर दिसला रोमँटिक अंदाज

Omar Abdullah-Nidhi Razdan : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी प्रसिद्ध पत्रकार निधी राजदान यांच्यासोबत विवाह करुन आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. लग्न झाल्याचं जाहीर केल्यापासूनच दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Nov 02, 2026 | 9:36 AM
1 / 5
या लग्नानंतर जवळच्या मित्र परिवारासाठी ठेवलेल्या रिसेप्शनमध्ये काही खास, न पाहिलेले क्षण पहायला मिळाले. लग्नानंतर जेव्हा दोन लोक आयुष्याची नवीन सुरुवात करतात त्यावेळी त्यांचा आनंद छोट्या-छोट्या गोष्टींमधून दिसून येतो. फोटोंमधून ते स्पष्टपणे दिसतं. उमर अब्दुल्ला आणि निधीच्या रिसेप्शन फोटोंमध्ये असचं काहीसं पहायला मिळत आहे.

2 / 5

काही फोटोंमध्ये दोघे परस्परांचा हात हातात घेऊन चालताना दिसतायत, तर काही फोटोंमध्ये दोघांची रोमँटिक नजरा-नजर दिसतेय. एक फोटोमध्ये निधी खुर्चीवर बसल्या आहेत आणि उमर जवळून त्यांचं सौंदर्य न्याहळतायत. दोघांच्या या रोमँटिक फोटोमधून खास नात्याची झलक दिसते.

3 / 5

रिसेप्शन लूकमध्ये निधीने रंगीत बनारसी साडी परिधान केली आहे तर उमरने क्लासिक बंदगळ्याचा कोट घातला आहे. दोघांचा लूक खूप लक्षवेधी आहे. फोटोंमधून उमर अब्दुल्ला आणि निधी राजदन यांची केमिस्ट्री दिसून येतेय.

4 / 5

एका फोटोत दोघे एका मोकळ्या लॉनवर हातात हात घालून चालताना दिसतायत. दोघांच्या चेहऱ्यावर प्रेमळ हास्य सुद्धा आहे. दोघे आपल्या आयुष्यातील खास क्षणाचा आनंद घेताना दिसतायत. दुसऱ्या एका फोटोत दोघे जवळ उभे असून परस्परांच्या डोळ्यात हरवून गेले आहेत.

5 / 5

दुसऱ्या एका फ्रेममध्ये निधी खुर्चीवर बसल्या आहेत. उमर त्यांच्यामागे उभे असून निधीकडे झुकलेले दिसतात. उमर निधीकडे प्रेमाने पाहत असून दोघांच्या चेहऱ्यावरील भाव या फोटोला खास बनवतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us