Jana Nayagan : पहिल्याच दिवशी ‘जन नायकन’ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी; लीक होऊनही छप्परफाड कमाई

'जन नायकन' या चित्रपटाला देशभरात 13,067 शोज मिळाले आहेत. त्यातून धमाकेदार कमाई झाली आहे. पहिल्या वीकेंडला कमाईत आणखी वाढ होणार, यात काही शंका नाही. थलपती विजय यांचा हा शेवटचा चित्रपट असल्याने चाहते थिएटर्समध्ये गर्दी करत आहेत.

| Updated on: Jul 24, 2026 | 11:56 AM
1 / 5
तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांच्या 'जन नायकन' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जागतिक बॉक्स ऑफिसच्या सिंहासनावर ताबा मिळवला आहे. विजय यांच्या शेवटच्या चित्रपटावर अक्षरश: नोटांचा वर्षाव झाला आहे.

2 / 5
सात महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर विजय यांचा पॉलिटिकल थ्रिलर 'जन नायकन' हा चित्रपट 23 जुलै रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे एडव्हान्स बुकिंगसुद्धा दमदार झाली होती. त्यामुळे प्रदर्शनाच्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करणार, हे आधीच समजलं होतं.

3 / 5
एच. विनोद दिग्दर्शित 'जन नायकन' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जेवढी कमाई केली, त्याच्या दुप्पट जगभरातील कमाईचा आकडा आहे. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने भारतात तब्बल 41 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तमिळ भाषेत सर्वाधिक कमाई झाली.

4 / 5
'जन नायकन'ने तमिळ भाषेत 36.50 कोटी रुपये, तेलुगू भाषेत 2.75 कोटी रुपये आणि हिंदीत 1.75 कोटी रुपये कमावले आहेत. परदेशातही या चित्रपटाची छप्परफाड कमाई झाली आहे. परदेशात पहिल्याच दिवशी 'जन नायकन'ने तब्बल 30 कोटी रुपये कमावले आहेत. कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी ही खूप मोठी बाब आहे.

5 / 5
भारत आणि परदेशातील कमाई मिळून हा आकडा 78.27 कोटी रुपयांवर गेला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तीन महिन्यांपूर्वी 'जन नायकन' हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला होता. त्यावेळी तब्बल 1.2 कोटी लोकांनी या चित्रपटाला पाहिलं होतं. तरीही आता अनेक थिएटर्समधील या चित्रपटाचे शोज हाऊसफुल झाले आहेत.

Follow Us