कपूर कुटुंबाची लेक होणार बड्या राजकीय घराण्याची सून, लग्न ठरलं, कधी होणार रॉयल वेडिंग?
बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी राजकीय कुटुंबात लग्न केलं आहे. आता बॉलिवूडच्या प्रतिष्ठित कपूर कुटुंबाची लेक सुद्धा बड्या राजकीय घराण्याची सून होणार आहे. दोघांचं लग्न ठरलं असून, जाणून घ्या रॉयल वेडिंग कधी होणार आहे.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नाही तर अभिनेत्री जान्हवी कपूर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जान्हवी, शिखर पहाडिया याला डेट करत आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.
शिखर पहारिया हा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. म्हणून जान्हवी कपूर राज्यातील बड्या राजकीय घराण्याची सून म्हणून संबोधलं जात आहे. दोघांना त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नाही. पण जान्हवी कायम दोघांच्या नात्याबद्दल हिंट देत असते.
आता देखील जान्हवी हिचा एक फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये जान्हवी हिच्या टी-शर्टकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. जान्हवीच्या टी-शर्टवर लिहिलं आहे, 'जर हरवलं तर, शिखर पहारिया याच्याकडे पोहोचवा...', सध्या जान्हवीचा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे.
याआधी देखील अनेकदा जान्हवीने शिरख याच्या नावाचा टी-शर्ट घातला आहे. तर त्याच्या नावाचा पेंडेंट देखील गळ्यात घातलेला. ज्यावर 'Shikhu' असं लिहिलं होतं. म्हणून शिखर आणि जान्हवी यांचं तर पक्क आहे... अशी सर्वत्र चर्चा रंगली आहे.
जान्हवी कपूर हिने वडील बोनी कपूर यांच्यासोबत देखील शिखर याचं नातं चांगलं आहे. अशात दोघांचं रॉयल वेडिंग कधी होणार... याच प्रतिक्षेत सर्व चाहते आहेत. दोघांने अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दोघांना चाहत्यांना देखील डोक्यावर घेतलं आहे.