जेजुरी गडावर खंडोबारायाचं देखणं रुप, तिळाच्या दागिन्यांनी नटले मार्तंड भैरव, पाहा Photos

महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा गडावर मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा झाला. खंडोबा आणि म्हाळसा देवीला तिळाच्या दागिन्यांची आकर्षक सजावट करण्यात आली असून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Namrata Patil | Updated on: Jan 14, 2026 | 1:16 PM
1 / 6
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर आज मकर संक्रांतीचा सण मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मकर संक्रांतीनिमित्त खंडोबा देवाला तिळाच्या दागिन्यांची आकर्षक सजावट करण्यात आली.

2 / 6
संक्रांतीचे औचित्य साधून जेजुरी गडावरील खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या मूर्तींना तिळापासून बनवलेले विशेष दागिने परिधान करण्यात आले होते. यामध्ये मुकुट, हार, बाशिंग आणि इतर अलंकारांचा समावेश होता.

3 / 6
पांढऱ्याशुभ्र तिळाची ही सजावट देवाच्या मूर्तीवर अत्यंत देखणी दिसत होती. ही सजावट पाहण्यासाठी आणि देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गडावर मोठी गर्दी केली होती.

4 / 6
जेजुरी शहर आणि परिसरातील सुवासिनींनी सकाळीच गडावर येऊन देवाचे दर्शन घेतले. मंदिर परिसरामध्ये महिलांनी पारंपरिक पद्धतीने एकमेकींना वाण देऊन मकर संक्रांत साजरी केली.

5 / 6
'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला' म्हणत अनेक सुवासिनींनी एकमेकींना शुभेच्छा दिल्या. गडाच्या पायऱ्यांपासून ते मुख्य मंदिरापर्यंत महिलांची मोठी लगबग पाहायला मिळत होती.

6 / 6
जेजुरीमध्ये मकर संक्रांतीला विशेष महत्त्व असते. सकाळच्या महापूजेनंतर ही विशेष सजावट करण्यात आली. भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषाने संपूर्ण गड दुमदुमून गेला होता. प्रशासनाकडून आणि देवस्थान समितीकडून गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.