
जेनिफरने हरेसमेंटवर खुलासा केलेला. असित मोदींनी एकवेळ माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केलेला. माझ्याबद्दल अश्लील कमेंट केलेल्या असा जेनिफर मिस्त्रीने आरोप केलेला.

कोर्टात असित आणि जेनिफरचा खटला दीर्घकाळ चालला. पिंकविलासोबत बोलताना जेनिफर म्हणाली की, तिच्याजवळ असित विरुद्ध अनेक ऑडियो रेकॉर्डिंग आहेत.

"मी ऑडियो प्रूफ ऐकवले तर मल्टी मिलियनेयर बनीन. तारक मेहतामध्ये आता जी कास्ट काम करते, त्यातल्या 10 पेक्षा जास्त लोकांच्या माझ्याकडे ऑडियो रेकॉर्डिंग आहेत" असं जेनिफर म्हणाली.

"तारक मेहता शो मध्ये जे असित मोदीचे विश्वासू आहेत, म्हणजे त्यांचे चमचे, त्यांची सुद्धा वक्तव्य आहेत. त्या सगळ्यांनी असित मोदींना भरभरुन शिव्या दिल्या आहेत" असा दावा जेनिफरने केलाय.

"असित जी नी असे रंग दाखवलेत, ज्या बद्दल मला माहित नव्हतं. मी ऐकलं होतं, पण हे ते लोक आहेत, ज्यांनी आपल्या डोळ्याने सर्व काही पाहिलय" असं मोठा दावा जेनिफरने केलाय. "मी अशीच असित मोदी विरोधात केस जिंकलेली नाही. सत्य समोर यायला वेळ लागतो. पण सत्य समोर येतं. विजय नक्की मिळतो" असं जेनिफर म्हणाली.