Jews live in Iran: इराणमध्येही ज्यू लोक गुण्यागोविंदाने रहातात, का नाही सोडत शत्रूचा देश ?

Iran Israel Conflict : ज्यू लोकांचा एकमेव देश असलेल्या इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्ध थांबायचे नावच घेत नाहीए.आता तर अमेरिकेने इराणच्या अणूभट्ट्यांवर थेट हल्ला केला आहे.इराणमधील भारतीयांना परत आणण्याची मोहीम सुरु आहे. अशात इराणमध्ये राहणाऱ्या ज्यू लोकांची देखील चर्चा सुरु आहे. चला तर इराणमध्ये नेमके किती ज्यू लोक राहतात आणि ते इस्राईलला परत का जाऊ इच्छित नाहीत.

| Updated on: Jun 23, 2025 | 3:56 PM
1 / 5
इराण आणि इस्रायलमधील युद्ध आता वेगळ्या वळणावर आहे. अमेरिकेने देखील इराणवर बॉम्ब टाकले आहेत. दोन्ही देशांच्या युद्धात आता महाशक्ती इराणच्या  मागे लागली आहे.  अमेरिकेने इराणच्या आण्विक तळांवर हल्ला केला आहे. इस्रायल हा ज्यूंचा एकमेव देश आहे, ज्यास चारही बाजूंनी मुस्लीम देशाने घेरलेले आहे.  परंत आश्चर्याची बाब अशी की इराणमध्येही ज्यू गुण्यागोविंदाने राहात आहेत. त्यांची प्रार्थनास्थळे आहेत. त्यांच्या स्वतंत्र शाळा देखील आहेत. इराणमध्ये किती इस्रायली ज्यू आहेत ते जाणून घेऊयात...

2 / 5
 वृत्तसंस्था जेएनएसच्या वृत्तानुसार, इराणमधील इस्लामिक क्रांतीच्या वेळी येथे ज्यू समुदाय सर्वाधिक संख्येने राहात होता. त्यावेळी येथे सुमारे १ लाख ज्यू रहात होते. सध्या त्यांची संख्या आता  कमी होऊन केवळ ९ हजार झाली आहे. इराणमधील तेहरान, शिराझ आणि इस्फहानमध्ये त्यांची संख्या जास्त आहे.

3 / 5
खास बाब म्हणजे की पश्चिमेशी वाढता तणाव आणि कठोर शरियत कायद्याचे पालन येथे असले तरी इराणमध्ये राहणारे ज्यू हा देश सोडून इस्राईलला जाण्यास नाखूश आहेत. असे का याबाबत इराणचे तज्ज्ञ आणि इस्राईली गुप्तचर संस्थेचे माजी अधिकारी डेव्हीड निसार म्हणतात ज्यूंना इस्राईलला आणण्यासाठी अनेकदा प्रोत्साहन दिले गेले. परंतू बहुतांशी ज्यू इस्राईलला जाऊ इच्छीत नाहीत. त्यांच्या अनेक पिढ्या येथे राहिल्याने, आर्थिक आणि सुरक्षा यामुळे त्यांना इराण सोडायचे नाही.

4 / 5
 इराणमधील ज्यू समुदाय संख्येने लहान असला तरी त्याला तेथे खूप खास दिलला जातो. कारण तो जगातील सर्वात जुन्या ज्यू समुदायांपैकी एक आहे. याचे सर्वात प्रमुख उदाहरण म्हणजे एस्थरचे पुस्तक, हे पुस्तक इराणमधील ज्यू समुदायाने इतिहासावर कसा प्रभाव पाडला हे सांगते. तज्ञांचे म्हणणे आहे की इराणचा ज्यू समुदाय आपली ऐतिहासिक आणि सांस्कृतिकमुळे सहजासहजी सोडण्यात तयार  नाही

5 / 5
सध्या इराणमध्ये ३० ज्यू प्रार्थनास्थळे आहेत. तेथे ज्यू शाळा आणि रेस्टॉरंट्स देखील आहेत. येथे राहणाऱ्या ज्यूंना कोणत्याही दडपणाशिवाय त्यांची ज्यू जीवनशैली अंगिकारण्याची परवानगी आहे. इराणमध्ये अधिकृत धार्मिक अल्पसंख्याक म्हणून, त्यांचे हक्क कायदा आणि येथील घटनेद्वारे संरक्षित आहेत आणि त्यांचा संसदेत एक प्रतिनिधी देखील आहे असे इराण तज्ज्ञ आणि माजी इस्रायली गुप्तचर अधिकारी डेव्हिड निसान यांनी सांगितले .