
झारखंडची राजधानी रांचीजवळील चुटीया हे ठिकाण अद्भूत मानण्यात येते. झारखंडमधील सर्वात मोठे शिवमंदिर या ठिकाणी आहे. हे शिवलिंग 160 फुट उंच आहे. ते तुम्हाला जवळपास 3 किलोमीटर दूर वरून सुद्धा दिसते.

या ठिकाणी तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात येतात. तरुणांची संख्या अधिक असल्याने या स्थानाला वेगळेच महत्त्व आहे. या ठिकाणी हे तरूण ध्यान लावतात. त्यांच्या जीवनातील कष्ट, अडचणी देवासमोर मांडतात.

16,17 ,18 वर्षाचे तरुण-तरुणींची गर्दी या ठिकाणी दिसते. ब्रेकअप, प्रेमात धोका, प्रेम टिकावे म्हणून, नवीन लग्न झालेली जोडपी, तर काही जण परीक्षेत चांगले गुण मिळावे असे नवस घेऊन येत असल्याचे स्थानिक सांगतात.

या मोठ्या शिवलिंगासमोर ध्यान धारणा केल्याने त्यांच्या मनातील अस्वस्थता, अस्थिरता कमी होते. याठिकाणी आसन व्यवस्था चांगली आहे. त्यामुळे अनेक जण याठिकाणी देवाजवळ शांती मिळण्यासाठी जमतात.

अनेक जणांना चांगली कंपण जाणवतात. त्यांना येथे शांती मिळते. मन प्रसन्न होते. मनाला उभारी मिळते, असे अनुभव तरुण सांगतात. हा त्यांचा व्यक्तिगत अनुभव आहे. त्याला टीव्ही९ दुजारा देत नाही.