
झारखंडमधील देवघर येथे 10 एप्रिल रोजी रोपवे अपघात झाला होता. तिथे अजूनही बचाव कार्य सुरू आहे. बचाव पथकाचे प्रभारी अश्वनी नय्यर म्हणतात, "दुपारपर्यंत आम्ही नागरिकांसह सर्वांना प्राधान्याने बाहेर काढू.

लोक रोपवेमध्ये अडकली आहेत त्याला आज तीन दिवस पुर्ण झाले आहेत. लोकांना रोपवेमध्ये अन्न पुरवण्यात आलं आहे.

दोन रोपवेमध्ये टक्कर झाल्याने हा अपघात झाला आहे. अनेकांचा मृ्त्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. परंतु सरकारकडून तशी कोणतीही घोषणा केलेली नाही. जखमींना तिथल्या जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एनडीआरएफचे तीन दिवसांपासून बचावकार्य करीत आहे. त्यांना दोन दिवस तिथं अनेक अडचणी आल्याने विलंब झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

या दुर्घटनेमुळे अनेकांनी चिंता वाटत आहे. कारण तीन दिवस झाले लोक रोपवेमध्ये अडकून आहेत. अनेकांना तिथून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.