Jio च्या ग्राहकांची चिंता मिटली, 3 महिन्यांसाठी मिळतोय 252 GB डेटा
Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक खास प्लॅन आणला आहे. याची किंमत आणि त्यात मिळणारे फायदे जाणून घेऊयात.
1 / 5

प्लॅनची किंमत: जिओने दररोज जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी खास प्लॅन आणला आहे. या प्लॅनची किंमत 1799 रुपये असून यात ग्राहकांना 84 दिवसांची वैधता मिळते.
2 / 5

डेटा : यामध्ये दररोज 3 GB हाय-स्पीड डेटा दिला जातो. अशा प्रकारे पूर्ण 84 दिवसांसाठी एकूण 252 GB डेटा मिळतो. तसेच, पात्र ग्राहकांनी अनलिमिटेड 5G डेटाची सुविधाही उपलब्ध आहे.
3 / 5

कॉलिंग आणि एसएमएस: ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित फ्री कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस पाठवता येतात. त्यामुळे हा प्लॅन आणखी खास बनतो.
4 / 5

ओटीटी सबस्क्रिप्शन (Netflix): या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 84 दिवसांसाठी नेटफ्लिक्स (Netflix) चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.
5 / 5

इतर जिओ ॲप्स: याशिवाय ग्राहकांना 3 महिन्यांसाठी जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) आणि जिओ टीव्ही (JioTV) चा मोफत अॅक्सेस दिला जातो.
Follow Us