PHOTO | एक क्रिकेट सामना खेळणारा खेळाडू ते BCCI अध्यक्ष, आता मोदी सरकारमध्ये महत्वाच्या पदावर

| Updated on: May 14, 2021 | 7:14 PM

क्रिकेटला (Cricket) रामराम ठोकल्यानंतर अनेक खेळाडूंनी राजकारणात प्रवेश केला आहे. मात्र अनुराग ठाकूर (Anurag thakur) यांचा क्रिकेट ते राजकारणापर्यंतचा प्रवास जरा वेगळा आहे.

1 / 5
क्रिकेट आणि राजकीय क्षेत्राचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा संबंध आहे. अनेक खेळाडूंनी क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर राजकीय खेळपट्टीवर जोरदार बॅटिंग केली आहे. मात्र माजी बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा क्रिकेट ते राजकारणापर्यंतचा प्रवास जरा वेगळा आहे. लहानपणापासून क्रिकेटचं वेड असलेल्या अनुराग यांनी रणजीमध्ये केवळ एकमेव सामना खेळला आहे. तिथपासून अनुरागने जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयचं अध्यक्षपद भूषवलं आहे.

2 / 5
अनुराग ठाकूर यांचा  जन्म 24 अक्टूबर 1974 रोजी झाला. अनुराग हे 2 वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या प्रेमकुमार धूमल यांचे पूत्र आहेत. अनुराग यांना लहानपासून क्रिकेटकडे ओढा होता. शिक्षणादरम्यान अनुराग यांनी अंडर 15 आणि 19 टीमचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर अनुराग यांच्या वडिलांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. त्याचा परिणाम अनुरागवर झाला.

3 / 5
अनुराग 3 वेळा लोकसभा खासदार राहिले आहेत. सध्या ते हमीरपूर या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. ठाकूर यांची 2000-2001 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी वर्णी लागली होती. पण त्यांची स्वप्न मोठी होती. त्यांना बीसीसीआयचं अध्यक्षपद खुणावत होतं. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा मैदानात पुनरागमन केलं.

4 / 5
अनुराग यांनी 2000-2001 मध्ये एकमेव फर्स्ट क्लास सामना खेळला. हा एकमेव सामना त्यांनी जम्मू काश्मिर विरुद्ध खेळला होता. या सामन्यात अनुरागला 7 चेंडूत एकही धाव करता आली नाही. मात्र बोलिंग करताना त्याने 2 विकेट्स घेतल्या होत्या. बीसीसीआयच्या निवड समितीमध्ये स्थान मिळवण्यासाठी उमेदवाराने  किमान 1 सामना खेळायला अशी अट आहे. ती अट अनुरागने पूर्ण केली होती.

5 / 5
अनुराग यांची आधी ज्यूनिअर क्रिकेट टीमच्या निवड समितीपदी वर्णी लागली. त्यानंतर 2015 मध्ये त्यांची बीसीसीआयच्या मानद सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. 22 मे 2016 मध्ये त्यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र जानेवारी 2017 मध्ये त्यांना न्यायालयामुळे अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं.