
मिस इंडियाचं विजेतेपद जिंकल्यानंतर जूही चावलानं चित्रपट जगतात पाऊल ठेवलं होतं. 90 च्या दशकात तिनं तिच्या जबरदस्त अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांची मनं जिंकली. तिच्या नावाचा आज चित्रपटसृष्टीमधील दिग्गज अभिनेत्रींमध्ये समावेश आहे. तर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहते नेहमीच उत्सुक असतात.

जुही चावलानं उद्योजक जय मेहता यांच्याशी लग्न केले असून त्यांना दोन मुलं आहेत. मुलगी जाह्नवी मेहता (Janhvi Mehta) आणि मुलगा अर्जुन मेहता (Arjun Mehta). दोन्ही मुले लाइमलाइटपासून लांब असतात. कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्येही ते कमीच असतात. अशा परिस्थितीत लोकांना बर्याचदा स्टारकिड्सविषयी जाणून घ्यायचं असतं.

एका मुलाखतीमुळे जूहीने सांगितलं होतं की मुलीला लेखक व्हायचंय आहे, परंतु काळानुसार ग्लॅमरच्या जीवनाकडे तिचा कल दिसू लागला ज्यानंतर जूहीने सांगितले की ती चित्रपटांतही पदार्पण करू शकते. ती म्हणाली की मुलांना करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य असले पाहिजे.

जेव्हा जूहीला विचारलं गेलं की जान्हवीची निवड काय आहे? यावर ती म्हणाली की तिला पुस्तकं आवडतात. ती अभ्यासात प्रचंड हुशार आहे ती तिच्या वर्गात पहिल्या दहामध्ये होती.

जूही चावला तिचा नवरा जय मेहता आणि शाहरुख खान कोलकाता नाइट (KKR) रायडर्स संघाची मालक आहे. नुकतंच झालेल्या आयपीएल सामन्यांच्या लिलावादरम्यान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि जुही चावला यांची मुलगी जान्हवी मेहता दिसले होते.

जान्हवी मेहता सोशल मीडियावर विशेषत: सक्रिय नाहीये. जुही चावला सोशल मीडियावर आपल्या दोन मुलांचे फोटो शेअर करत असते. जान्हवी सध्या लंडनमध्ये शिकतेय. ती अनेकदा तिच्या मित्रांसह फोटो शेअर करते.