
'कच्चा बदाम' या व्हायरल गाण्यावर डान्सची रील बनवून अंजली अरोरा तुफान लोकप्रिय झाली. या लोकप्रियतेनंतर तिने कंगना राणौत यांच्या 'लॉकअप' शोमध्ये भाग घेतला होता. नुकतीच ती बॉयफ्रेंड आकाश संसलवालच्या वाढदिवसानिमित्त चर्चेत आली आहे.

बॉयफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त अंजलीने त्याला सर्वांत मोठी भेट दिली आहे. या सेलिब्रेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले असून सध्या चाहत्यांमध्ये त्याचीच चर्चा आहे.

अंजलीने अत्यंत भव्यदिव्य पद्धतीने बॉयफ्रेंड आकाशचा वाढदिवस साजरा केला आहे. रोषणाई आणि फुग्यांनी सर्वत्र सजावट करण्यात आली. यावेळी अंजलीने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता.

अंजलीने आकाशच्या वाढदिवसाच्या पार्टीत त्याच्या मित्रमैत्रिणींनाही आमंत्रित केलंय. बर्थडे पार्टीत सर्वांनी मिळून खूप धमाल केल्याचं या फोटोंमध्ये पहायला मिळतंय.

अंजलीने आकाशला वाढदिवसानिमित्त काही भेटवस्तू दिल्या आहेत. मात्र त्यातल्या एका भेटवस्तूने सर्वांचं लक्ष वेधलंय. या फोटोंमध्ये अंजलीच्या हातात एक कार्ड पहायला मिळतंय. त्यावर 'नवीन घर' असं लिहिलंय आणि आकाशसाठी विशेष मेसेजसुद्धा त्यावर लिहिलंय.

कार्डवरील 'नवीन घर' हे वाचून अंजलीने तिच्या बॉयफ्रेंडला नवीन घर भेट म्हणून दिल्याची चर्चा रंगली आहे. अंजलीचं हे मोठं गिफ्ट पाहून सर्व मित्रमैत्रिणीही थक्क झाले आहेत.

अंजली अरोराचा बॉयफ्रेंड आकाशसुद्धा डिजिटल क्रिएटर आहे. सोशल मीडियावर त्याचाही मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांना आता या दोघांच्या लग्नाची फार उत्सुकता आहे.