Asia Cup Controversy : मोहसिन नक्वी ट्राॅफी द्यायला धडपडले, आता कपिल देव यांनीही डिवचलं, म्हणाले…
Kapil Dev News : आशिया चषकाच्या ट्रॉफीवरून सुरू असलेल्या चर्चेवर भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी मिश्कील अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे. छत्तीसगडमधील ‘नवा रायपूर ओपन २०२६’ गोल्फ स्पर्धेदरम्यान त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

मोहसीन नक्वी यांच्याकडून आशिया चषकाची ट्रॉफी न घेण्याच्या भारतीय संघाच्या निर्णयावर भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भाष्य केले आहे.गोल्फ स्पर्धेदरम्यान याविषयी विचारले असता त्यांनी अत्यंत मजेशीर अंदाजात "त्या सर्वांना गोल्फ खेळायला सांगा" असे उत्तर दिले.
छत्तीसगडमध्ये आयोजित 'नवा रायपूर ओपन २०२६' (Nava Raipur Open 2026) या गोल्फ स्पर्धेसाठी कपिल देव उपस्थित होते. तिथेच त्यांना या वादाबद्दल विचारण्यात आले होते आणि तेव्हा त्यांनी दिलेले हे उत्तर सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या महिला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला हरवून विजेतेपद पटकावले. पण या सामन्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या मोहसीन नक्वी यांच्याकडून भारतीय महिला संघाने ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार दिला, ज्यामुळे हा विषय चर्चेत आला.
याआधी २०२५ मध्ये जेव्हा भारतीय पुरुष संघाने आशिया चषक जिंकला होता, तेव्हा त्यांनीही मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारली नव्हती. त्यावेळी नक्वी ती ट्रॉफी स्वतःसोबतच घेऊन निघून गेले होते आणि ती ट्रॉफी अद्यापही टीम इंडियाला मिळालेली नाही.
२०२७ मध्ये होणाऱ्या एशियन गेम्सपूर्वी (Asian Games) मोहसीन नक्वी यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे त्यापुढील काळात जर भारतीय संघाने विजेतेपद मिळवले, तर ट्रॉफी स्वीकारण्यावरून कोणताही वाद निर्माण होणार नाही.