कपिल शर्माच्या शोमध्ये अर्चनापेक्षाही ‘या’ कलाकाराला अधिक मानधन, जाणून घ्या इतरांचीही फी; आकडे पाहून व्हाल थक्क!

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा पाचवा सीझन 26 सप्टेंबरपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू झाला आहे. कपिल शर्मा, सुनील ग्रोव्हर, कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, अर्चना पूरन सिंह आणि नवजोत सिंह सिद्धू अशी लोकप्रिय टीम पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. नव्या सिझनच्या निमित्ताने या कलाकारांना एका एपिसोडसाठी किती मानधन मिळतं, हे जाणून घेऊयात..

| Updated on: Sep 28, 2026 | 12:34 PM
1 / 6
रिपोर्ट्सनुसार, शोचा सूत्रसंचालक आणि मुख्य चेहरा कपिल शर्मा याला एका एपिसोडसाठी तब्बल पाच कोटी रुपये मानधन मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. कपिल शर्मानेच या शोची सुरुवात केली होती आणि गेल्या काही वर्षांत हा शो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. नेटफ्लिक्सवरील या शोमध्येही त्याचं होस्टिंग, सेलिब्रिटींसोबतची मजेशीर बातचीत आणि कलाकारांसोबतची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळते.

2 / 6

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये नवजोत सिंह सिद्धू यांचीही पुन्हा एण्ट्री झाली आहे. गेल्या सिझनमध्ये त्यांनी शोमध्ये कमबॅक केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धू यांना एका एपिसोडसाठी 30 ते 40 लाख रुपये मानधन मिळत असल्याचं म्हटलं जातं.

3 / 6

‘गुत्थी’, ‘डॉ. मशहूर गुलाटी’ यांसारख्या व्यक्तिरेखांमुळे लोकप्रिय झालेला सुनील ग्रोव्हर हा शोमधील महत्त्वाचा कलाकार आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याला एका एपिसोडसाठी सुमारे 25 लाख रुपये मिळत असल्याचं सांगितलं जातं. कपिलसोबत त्याची ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडते.

4 / 6

कृष्णा अभिषेक त्याच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आणि भन्नाट कॉमेडीसाठी ओळखला जातो. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला एका एपिसोडसाठी सुमारे दहा लाख रुपये मानधन मिळतं.

5 / 6

अर्चना पुरण सिंह या शोमध्ये त्यांच्या खळखळून हसण्यामुळे विशेष लोकप्रिय आहेत. त्यांच्या मानधनाबाबत रिपोर्ट्समध्ये 10 ते 12 लाख रुपये प्रति एपिसोड असा आकडा नमूद करण्यात आला आहे. स्वतः अर्चना यांनी यापूर्वी सांगितलं होतं की, शोमध्ये कपिलचं मानधन तिच्यापेक्षा अधिक आहे.

6 / 6

शोमधील विविध व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांना हसवणारा कीकू शारदा याचंही मानधन लाखोंमध्ये असल्याचं रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, त्याला एका एपिसोडसाठी सुमारे 7 लाख रुपये मिळत असल्याचं सांगितलं जातं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us