
करिना कपूर खान हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. करिना कपूर सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही करिना दिसते.

नुकताच करिना कपूर हिने एक खुलासा केलाय. करिना कपूर हिने नाश्त्याच्या प्लेटच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचे दिसत आहे.

नाश्त्याच्या प्लेटचा फोटो शेअर करत करिना कपूर हिने लिहिले की, मी एक अशी आई आहे, जी मुलांनी अर्धेवट सोडलेले जेवण खाते.

म्हणजेच काय तर करिना कपूर हिच्याकडून सांगण्यात आले की, मी मुलांचे उरलेले अन्न खाते. करिना कपूर हिने शेअर केलेल्या प्लेटमध्ये पॅनकेक आणि क्रीम दिसत आहे.

अनेकांनी यावर कमेंट करत म्हटले की, सर्वच आई असे करतात. करिना कपूर ही नेहमीच चर्चेत असणारे एक नाव नक्कीच आहे.