बिकिनी परिधान करून समुद्रात उतरली करीना, फोटोंची सोशल मीडियावर चर्चा, विना मेकअप लूकवर चाहते फिदा
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने बिकिनीमधील समुद्रामधील खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या पती सैफ अली खान आणि कुटुंबासोबत ग्रीसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या खास सुट्ट्यांमधील अनेक सुंदर क्षण तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अलीकडेच करीनाने डोक्यावर स्टायलिश बंदाना बांधून विविध पोझमधील फोटो पोस्ट केले होते. या फोटोंसोबत तिने, मला बंदाना खूप आवडतो, हे तुम्ही पाहू शकता, असे मजेशीर कॅप्शन दिले होते.

तिचा हा साधा पण आकर्षक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. याआधी करीनाने एजियन समुद्रात व्हाईट बिकिनीमध्ये स्विमिंगचा आनंद घेतानाचे फोटोही शेअर केले होते. हे फोटो खासगी यॉटवरून टिपण्यात आले असून, त्याला फक्त मी आणि एजियन सी असे कॅप्शन तिने दिले होते.

याशिवाय करीनाने सैफ अली खानचेही काही खास फोटो पोस्ट केले आहेत. समुद्रातून शर्टलेस अंदाजात बाहेर येताना सैफचा लूक एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा दिसत असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली.

करीना आणि सैफ यांच्या ग्रीसमधील या सुट्ट्यांतील फोटोंना सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून, चाहत्यांकडून त्यांच्या स्टाइल, लूक आणि कौटुंबिक क्षणांचे कौतुक केले जात आहे.