सारा-अनन्यानंतर करीनाला डेट करतोय कार्तिक आर्यन? फोटो व्हायरल

कार्तिक त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी सारा अली खान आणि अनन्या पांडेसोबत त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चा होत्या. कार्तिकचं नाव साऊथची अभिनेत्री श्रीलीलासोबतही जोडलं गेलंय.

| Updated on: Jan 06, 2026 | 3:41 PM
1 / 6
अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या गोवा व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यात एका मिस्ट्री गर्लने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कार्तिक या तरुणीला डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे.

2 / 6
कार्तिक आर्यनचं नाव जिच्यासोबत जोडलं जातंय, ती 18 वर्षांची चीअरलीडर करीना कुबिलियूते आहे. ती मूळची युकेची आहे. कार्तिक आर्यन आणि करीना कुबिलियूते यांच्या गोवा व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

3 / 6
दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. त्या फोटोंमध्ये बीच बेड, टॉवेल आणि बॅकग्राऊंडसुद्धा एकसारखेच दिसत असल्याने नेटकऱ्यांनी चर्चा करण्यास सुरुवात केली. ही करीना नेमकी आहे तरी कोण, याविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.

4 / 6
'संडे गार्डियन'ने दिलेल्या वृत्तानुसार, करीना कुबिलियूते हिने युनायटेड किंग्डमच्या कार्लिसल कॉलेजमध्ये शिक्षण घेतेय. त्याचसोबत ती चीअरलीडरसुद्धा आहे. करीनाच्या वयाची सर्वाधिक चर्चा होत आहे, कारण ती फक्त 18 वर्षांची आहे. तर कार्तिक हा 35 वर्षांचा आहे.

5 / 6
करीनाच्या पब्लिक प्रोफाइल्सवर फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु 2024 मधील हायस्कूल ग्रॅज्युएशन पार्टीतील फोटो आणि 2019 मध्ये वयाच्या 11 व्या वर्षी तिच्या एका स्थानिक बातमीवरून तिच्या वयाचा अंदाज लावला जात आहे. काही रिपोर्ट्समध्ये करीना मूळची ग्रीसची असल्याचंही म्हटलं जात आहे. परंतु तू युकेमध्ये राहते.

6 / 6
कार्तिक आर्यनने करीनाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला फॉलो केलं होतं, परंतु चर्चांनी जोर धरताच त्याने तिला अनफॉलो केलं. आतापर्यंत कार्तिक किंवा करीना यांपैकी कोणीच चर्चांवर प्रतिक्रिया दिली नाही.