
अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेत्याचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडण्यात आलं.

कार्तिक आर्यन फक्त त्याच्या अफेअर्समुळे नाही, दिग्दर्शक करण जोहर याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील तुफान चर्चेत आला. दरम्यान, इंडियन फिल्म फेस्टिवल मेलबर्न 2023 मध्ये कार्तिक आणि करण एकत्र दिसले.

फिल्म फेस्टिवलमध्ये करण आणि कार्तिक यांना एकत्र पाहिल्यानंतर दोघे लवकरच नव्या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार अशी चर्चा रंगत आहे. सध्या सर्वत्र करण आणि कार्तिक यांची चर्चा रंगत आहे.

फिल्म फेस्टिवल दरम्यान करण याने कार्तिक याच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. पण करण याने केलेल्या वक्तव्यावर कार्तिक याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही..

कार्तिक याच्या लग्नाबद्दल करण म्हणाला, 'वर्षाच्या शेवटी कार्तिक विवाहबंधनात अडकेल...' असं वक्तव्य करण याने केलं आहे. म्हणून कार्तिक याची होणारी पत्नी कोण असेल याची चर्चा रंगली आहे.