
अभिनेत्री कतरिना कैफ हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. कतरिना कैफची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

कतरिना कैफ हिने सलमान खान आणि त्यानंतर रणबीर कपूरला देखील डेट केले आहे. सध्या कतरिना कैफ हिचा एक जुना व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.

या व्हिडीओमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी रणबीर कपूर आणि कतरिना कैफ एका शोमध्ये पोहचल्याचे बघायला मिळतंय. यावेळी एक मुलगा कतरिना कैफला प्रश्न विचारतो.

तो लहान मुलगा कतरिना कैफ हिला म्हणतो की, सलमान खान सर की रणबीर कपूर सर यांच्यापैकी तुम्ही कोणासोबत लग्न करणार.

यावर कतरिना कैफ जोरात हसते आणि म्हणते की, इकडे ये मी तुझ्यासोबतच लग्न करते. आता कतरिना कैफ हिचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.