
किचन किंवा बेडरूममध्ये किंवा घराच्या मध्यभागी फिश टॅंक ठेवू नका. घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला फिश टॅंक ठेवा. तसेच, फिश टॅंकवर सूर्यप्रकाश येत आहे की नाही याची खातरजमा करुन घ्या. असे केल्यास तुमच्या करिअरमध्ये चांगली वाढ होते आणि घरात आनंद होतो.

मत्स्यालयातील माशांची संख्या किमान नऊ असावी. असे मानले जाते की जर तुम्ही पाळलेले मासे नैसर्गिक मृत्यूने मरण पावले तर ते मासे तुमच्या घरावर आलेले संकट आणि समस्या घेऊन जातात.

एखादा मासा मेला तर तो त्वरीत तिथून काढून नवीन मासा फिश टँकमध्ये टाकावा. जेणेकरून टाकीतील माशांची संख्या कमी होणार नाही. वेळोवेळी फिश टॅंक साफ राहील याची खात्री करावी. जर पाणी प्रदूषित होत असेल तर त्यात अँटी-क्लोरीन पांढर्या गोळ्या टाकता येतील.

माशांमध्ये एक काळा मासा, एक सोनेरी मासा आणि एक लाल मासा असावा. त्यांच्याकडे घराच्या सुखाशी निगडित म्हणून पाहिले जाते. त्यामुळे घरात सकारत्मकात निर्माण होते.