
प्रत्येक व्यक्तीला आपले तसेच आपल्या कुटुंबाचे आयुष्य सुखात असावे असे वाटते. घरात सुख तसेच शांती नांदावी यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. परंतु लोकांची वाईट नजर लागली की नकारात्मक उर्जा येते आणि वाईट काळ सुरू होतो, असे म्हटले जाते.

नजर लागू नये म्हणून अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. परंतु तुमच्यावर खरंच कोणावर वाईट नजर पडू नये असे वाटत असेल तर खिशात फक्त या चार वस्तू ठेवाव्यात. या चार वस्तूंमुळे तुमच्यावर कोणाचीही वाईट नजर पडणार नाही. या चार वस्तू कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या....

वाईट नजरेपासून वाचण्यासाठी तुमच्या खिशात लवंग जरूर ठेवावी. खिशात, पर्समध्ये आठ ते नऊ लगंवा ठेवाव्यात. लवंग ही तुम्हाला वाईट नजरेपासून वाचवते. लवंग खिशात ठेवताना लाल कागदात ठेवावी. लवंग तुमच्या पैशांचे रक्षण करते, असे म्हटले जाते.

इलायचीदेखील तुमच्यावर कोणाची वाईट नजर पडू देत नाही. तुमच्या खिशात इलायची ठेवल्यास तुमचे रक्षण होते. यामुळे तुमच्या भोवताली सकारात्मक उर्जा निर्माण होते. वेळोवेळी ही इलायची बदलत राहावी. यामुळे तुमच्या अवतीभोवती सुगंधी वातावरण राहते. तसेच निगेटिव्हिटीदेखील दूर होते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.