Photo : ‘खतरों के खिलाडी 11’ केपटाऊनमध्ये, स्पर्धक शूटिंगसाठी रवाना

‘खतरों के खिलाडी 11’ या शोची चाहते उत्सुकतेनं प्रतिक्षा करतात. (‘Khatron Ke Khiladi 11’ in Cape Town, the contestant leaves for shooting)

VN | Updated on: May 07, 2021 | 10:50 AM
1 / 9
‘खतरों के खिलाडी 11’ या स्टंट शोची चाहते उत्सुकतेनं प्रतिक्षा करतात. या शोमध्ये अनेक टीव्ही कलाकार जबरदस्त स्टंट्स करताना दिसतात. शोच्या या पर्वात कोणते सेलेब्स सहभागी होणार आहेत हे आम्ही तुम्हाला सांगितलंच आहे. काल रात्री सर्व सेलेब्स केपटाऊनला रवाना झाले आहेत. त्यांना विमानतळावर एकत्र स्पॉट करण्यात आलं. यावर्षी टीव्ही जगतातील प्रसिद्ध सून श्वेता तिवारीही खतरों के खिलाडी 11 मध्ये झळकणार आहे. अन्य स्पर्धकांसह श्वेताही विमानतळावर दिसली.

2 / 9

नुकतंच निक्की तांबोळीनं आपल्या भावाला गमावलंय. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितलं की ती या शोचा एक भाग असेल. ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये निक्कीला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं.

3 / 9

बिग बॉस 14 मधील टास्कमध्ये आपली ताकद दाखवल्यानंतर अभिनव शुक्ला या शोमध्ये स्टंट करताना दिसणार आहे. त्याला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं आहे.

4 / 9

टीव्हीची प्रसिद्ध सून श्वेता तिवारीही या शोमध्ये सहभागी होणार याची कोणालाही कल्पना नव्हती. विमानतळावर तिला पाहून लोक चकित झाले. यावर्षी टीव्हीची ही सून या शोममध्ये जबरदस्त स्टंट करताना दिसणार आहे.

5 / 9

टीव्हीवर अनेकदा कृष्णाची भूमिका साकारणारे सौरभ राज जैन देखील या शोच्या शूटसाठी केपटाऊनला रवाना झाले आहेत.

6 / 9

बिग बॉस 13 मध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर विशाल आदित्य सिंह आता या शोमध्ये स्टंट करताना दिसणार आहे.

7 / 9

या कार्यक्रमात भाग घेण्याबाबत अर्जुन बिजलानी यांनी यापूर्वीही सांगितलं होतं. त्याला विमानतळावर वेगळ्या प्रकारे स्पॉट करण्यात आलं.

8 / 9

टीव्ही अभिनेत्री सबा मकबूललाही विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. तिच्या या मस्त स्टाइलमुळे शोच्या चाहत्यांना ती आवडेल.

9 / 9

बर्‍याच शोचा भाग झाल्यानंतर वरुण सूद खतरों के खिलाडी 11 चा एक भाग होणार आहे. त्याची गर्लफ्रेन्ड दिव्या अग्रवाल त्याला विमानतळावर सोडण्यासाठी आली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us