गुलाबी कुर्ता, डोक्यावर ओढणी अन् चेहऱ्यावर भक्तिभाव; वाढदिवशी खुशबू तावडे स्वामी समर्थांच्या चरणी लीन

Khushbu Tawde : अभिनेत्री खुशबू तावडेने पती संग्राम साळवी आणि मुलांसोबत अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. यावेळचा तिचा भक्तिमय अंदाज लक्ष वेधून घेत आहे. देवदर्शनाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले असून, या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

| Updated on: Sep 06, 2026 | 7:10 PM
1 / 5
मराठमोळी अभिनेत्री खुशबू तावडेने तिच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. काल पाच सप्टेंबर रोजी तिचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त खुशबू तावडेने पती संग्राम साळवी आणि मुलांसोबत अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं.

मराठमोळी अभिनेत्री खुशबू तावडेने तिच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. काल पाच सप्टेंबर रोजी तिचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त खुशबू तावडेने पती संग्राम साळवी आणि मुलांसोबत अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं.

2 / 5

खुशबूने हे सर्व फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये श्री स्वामी समर्थ अक्कलकोट अशी कॅप्शन दिली आहे. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रचंड प्रेम व्यक्त केलं आहे. त्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

3 / 5

वाढदिवसानिमित्त अभिननेत्री प्रचंड भक्तिमय वातावरणात दिसून आली आहे. यावेळी तिच्या गुलाबी रंगाच्या कुर्त्यानेही लक्ष वेधलं. त्याचबरोबर तिने यावेळी डोक्यावर ओढणीही घेतली होती.

4 / 5

दरम्यान, खुशबूने प्रसिद्ध अभिनेता संग्राम साळवी याच्याशी विवाह केला आहे. यावेळी संग्रामने पांढरा शर्ट घातला होता. तर त्यांची दोन्ही मुले अतिशय आनंदात दिसून आले.

5 / 5

वाढदिवसाच्या निमित्ताने तिने नवऱ्यासोबत आणि मुलांसोबत श्री क्षेत्र अक्कलकोटमध्ये जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतलं आहे. या देवदर्शनाचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन चाहत्यासोबत शेअर केले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us