
सध्या लग्न कार्याचे दिवस सुरू झाले आहेत. तुम्हाला सर्वकडे नवीन कपडे आणि फॅशनेबल ट्रेन्ड्स दिसत असतील. बॉलिवूड दिवा कियारा अडवाणीनेसुद्धा बॅकलेस गुलाबी लेहेंगा परिधान करुन इंटरनेटवर आग लावली. तिने गुलाबी रंगाचा, कियाराने बॅकलेस ब्लाउज आणि रास्पबेरी पिंक आणि क्रीम ऑर्गेन्झा लेहेंगा परिधान केला आहे.

तिने परिधान केलेल्या गुलाबी बेस लेहेंग्यामध्ये मिरर हॅन्ड एम्ब्रॉयडरी पाहायला मिळत आहे. कियारा अडवाणीच्या सौदर्यात हा लेहेंगा अजूनच भर घालत आहे. या लेहेंग्यामुळे तीला अजूनच रिच लुक आला आहे.

या लेहेंग्यावर कियाराने गुलाबी रंगाचा दुपट्ट्यासुद्धा घेतला आहे. त्याच्या बॉडर्रलासुद्धा मिरर वर्क लेस करण्यात आली आहे. लुक खुलून दिसण्यासाठी तिने ब्रेसलेट आणि चोकरसुद्धा वापरला आहे.

मोहक पोझ देत, कियाराने इंटरनेटला तुफानच आणले आहे. तिनेतच्या लूक वरती नेटकरीसुद्धा फिदा आहेत.

अर्पिता मेहता यांनी हा ड्रेस यांनी डिझाईन केला आहे. या ड्रेसमध्ये कियारा खूपच सुंदर दिसत आहे. कंपनीच्या वेबसाइटवर या रास्पबेरी पिंक लेहेंग्याची मूळ किंमत 3,25,000 रुपये दाखवण्यात आली आहे.