दहापट पैसे मिळाले असणार, म्हणून त्यांनी हिंदीत नोकराचा रोल..; लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्याबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य
Ashok Saraf And Lakshmikant Berde: अभिनेते किरण करमकर यांनी अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या हिंदी चित्रपटातील छोट्या भूमिकेवर भाष्य केले आहे.

मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय असलेले अभिनेते किंवा अभिनेत्री हिंदी सिनेसृष्टीत मात्र लहान भूमिका करतात किंवा नोकरचे काम करतात यावर आता अभिनेते किरण करमरकर यांनी आपले मत मांडले आहे.
नाव न घेता त्यांनी एका मराठी अभिनेत्याच्या विधानावर असहमती दर्शवली आहे. तर लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचे उदाहरण देत त्यांच्या हिंदीतील कामाचा आणि मिळवलेल्या यशाचा उल्लेख केला.
अभिनेते किरण करमकर म्हणाले की," एक अभिनेता आहे तो नेहमी म्हणत असतो, मराठीत इतके मोठे नट पण हिंदीत नोकरची भूमिका करतात, छोटे छोटे रोलही करतात, अमूक तमूक. पण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पैसे कसे कमवायचे, करिअक कसं घडवायचे?"
"अगदी लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी ही नोकराची भूमिका केली आहे, जे हाताला लागलं ते त्यांनी केलं, दोघे ही मराठी चित्रपटांतील आघाडीचे अभिनेते पण हिंदीत त्यांनी अगदी लहान भूमिका केल्या. त्याचे त्यांना दहापट पैसे मिळाले असणार हे नक्कीच." असं अभिनेते किरण करमरकर म्हणाले.
"पैशांसाठी काम केले असावे, प्रत्येकाला आपापले निर्णय घेऊद्या ना, दुसऱ्यांनी कसं जगायचे हे तुम्ही का ठरवतात." असं यावेळी किरण करमकर म्हणाले.