Bollywood Actor : तू भीक मागणार.. अनेकांनी शाप देऊनही खचला नाही अभिनेता, आज आहे देशात प्रसिद्ध
या अभिनेत्याने उंचीवरून होणारी थट्टा आणि मुंबईतील संघर्षावर मात करत आईच्या विश्वासाने व मेहनतीने अभिनय क्षेत्रात यश मिळवले. आज तो प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करतो.

नशिबाने लहानपणापासून या अभिनेत्याची कठीण परीक्षा घेतली. त्याच्या उंचीवरून होणारी थट्टा तसेच मुंबईतील संघर्ष यामुळे त्याचा प्रवास खडतर होता. परंतु आईच्या विश्वासाने आणि स्वतःच्या अथक मेहनतीने त्याने यश मिळवत घराघरात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
के.के. गोस्वामी यांनी आपल्या आयुष्यात अनेक संघर्षांचा सामना करत अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. लहानपणी बुटक्या उंचीमुळे त्यांना अनेक टोमणे सहन करावे लागले. मात्र, त्यांच्या आईचा त्यांच्यावर असलेला विश्वास आणि प्रोत्साहन त्यांच्यासाठी मोठी ताकद ठरली.
लहानपणापासूनच त्यांच्या उंची आणि शरीरयष्टीवरून त्यांची अनेकदा थट्टा केली जात होती. मात्र, आईचा त्यांच्यावर असलेला विश्वास आणि अभिनेता होण्याचे स्वप्न यामुळे त्यांनी संघर्ष सुरूच ठेवला. 1992 मध्ये मुंबईत आल्यानंतरही उपेक्षा आणि उपासमारीचा सामना करत त्यांनी आपल्या स्वप्नासाठी जिद्दीने प्रयत्न केले.
कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर केके यांनी आपल्या संगीत कारकिर्दीत हळूहळू यशाची पायरी चढली. त्यांच्या संघर्षाच्या काळात विवेक अग्निहोत्री आणि बप्पी लाहिरी यांनी दिलेल्या संधींनी त्यांच्या प्रवासाला नवी दिशा मिळाली.
2001 मध्ये त्यांना ‘ज्युनियर जी’ मालिकेत मुख्य खलनायकाची भूमिका मिळाली. यानंतर ‘शक्तिमान’, ‘सोन परी’ आणि ‘शाका लाका बूम बूम’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.‘शक्तिमान’मध्ये सुरुवातीला त्यांना केवळ “अंधेरा कायम रहे” हा एकच संवाद मिळाला होता. 2003 मध्ये ‘विकराल और गब्राल’ मालिकेत त्यांनी ‘गब्राल’ची मुख्य भूमिका साकारली. या भूमिकेमुळे त्यांचे अभिनेता होण्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झाले.
अभिनेते के. के. गोस्वामी यांनी बॉलिवूडमध्ये बुटकेपणा असलेल्या कलाकारांना मिळणाऱ्या भूमिकांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. हॉलिवूडमध्ये अशा कलाकारांना महत्त्वाच्या आणि प्रभावी भूमिका मिळतात, मात्र बॉलिवूडमध्ये तशी संधी कमी मिळते, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, के. के. गोस्वामी लवकरच ‘तुंबाड’च्या निर्मात्यांच्या आगामी वेब सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी आणि कुणाल खेमूसोबत दिसणार आहेत.