
छोटा पुढारी अर्थात सर्वांचा आवडता घनश्याम दरोडे हा बिग बॉस मराठी 5 मध्ये सहभागी झालाय. विशेष म्हणजे हा बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसतोय.

छोट्या पुढारीचा अंदाज लोकांना जबरदस्त आवडताना दिसतोय. छोट्या पुढारीची उंची 3 फूट 7 (112 सेमी) इंच आहे. सर्वाधिक चर्चेत असलेला बिग बॉसच्या घरातील सदस्य आहे.

विशेष म्हणजे छोट्या पुढारीचे शिक्षण हे पदवीपर्यंत झाले आहे. म्हणजेच काय तर छोटा पुढारी हा पदवीधर आहे. याच्याबद्दल नुकताच खुलासा झालाय.

यासोबतच छोट्या पुढारीचे बोलण्यावरही चांगलेच प्रभुत्व आहे. छोटा पुढारी दिसण्यास जरी लहान मुलांसारखा दिसत असला तरीही तो 22 वर्षांचा आहे.

छोट्या पुढारीची सोशल मीडियावरही जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आता पुढील काही दिवसांमध्ये तो बिग बॉसच्या घरात काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.