
अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रने 80 ते 90 च्या दशकामध्ये एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे मीनाक्षी शेषाद्री यांचा चाहता वर्गही अत्यंत मोठा होता.

असे असूनही मीनाक्षी शेषाद्री बाॅलिवूड चित्रपटांमधून अचानक गायब झाल्या. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अनेक मोठ्या स्टारसोबत मीनाक्षी शेषाद्रीने मुख्य भूमिका या केल्या.

इतकेच नाही तर 17 व्या वर्षीच मीनाक्षी शेषाद्री मिस इंडिया झाल्या. मनोज कुमार यांचा चित्रपट 'पेंटर बाबू' मधून मीनाक्षी शेषाद्रीने बाॅलिवूडमध्ये डेब्यू केला.

सर्व असूनही मीनाक्षी शेषाद्री या अचानक बाॅलिवूडमधून गायब झाल्या. मीनाक्षी शेषाद्रीने 1995 मध्ये बॅंकर हरीश मैसूर यांच्यासोबत लग्न केले आणि त्या अभिनयापासून दूर गेल्या.

लग्नानंतर मीनाक्षी शेषाद्री या अमेरिकेमधील टेक्सासमध्ये शिफ्ट झाल्या. आता मीनाक्षी शेषाद्री या दोन मुलांची आई आहे. अभिनयाला जरी सोडचिठ्ठी मीनाक्षी यांनी दिली तरीही त्या आज क्लासिकल डांस शिकतवतात.