
रेल्वे

Indian Railway

खरेतर तसे पाहायला गेले तर रेल्वे रुळाच्या बाजूला जे खांब असतात त्या खांबांना बांधून अनेक वायर्स आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वायर यांचा गुंता सुद्धा आपल्याला अनेकदा दिसतो ज्यात सर्वात वरची जी वायर असते ती कोटेनरी वायर असते आणि त्या वायरच्या खाली कॉन्टॅक्ट वायर असते. या दोन वायरच्या मधोमध ड्रोपनच्या आधारे अंतर ठेवला जातो.यामुळे वायर नेहमी खाली राहते आणि पेंटोग्राफ शी जोडलेली राहते.

पेंटोग्राफच्या सहाय्याने वर लावण्यात आलेल्या वायरला करंट मिळतो. या वायर मध्ये प्रवाहित होणारा करंट 25KV म्हणजेच 25,000 वोल्ट इतका असतो ,हे करंट विद्युत इंजिनच्या मेन ट्रांसफार्मर मध्ये येतो, ज्यामुळे इंजिन सुरू होते.

या वायर मधील सर्वात वरील जी वायर असते ती कॉपरची असते आणि खाली असणारी वायर हलक्या लोखंडाची असते त्याचबरोबर या वायरला वेळोवेळी बदलले सुद्धा जाते. यामध्ये या वायरच्या साह्याने करंट पुरविला जातो आणि हे करंट इंजिनला पोहचल्या नंतर इंजिन चालवण्याचे कार्य पार पाडले जाते.