
‘कोकण हार्टेड अंकिता वालावलकरचं नुकतंच लग्न झालं. 16 फेब्रुवारीला मोठ्या थाटामाटात अंकिताने संगीतकार कुणाल भगतशी लग्नगाठ बांधली.(Photos : Instagram / Ankita PrabhuWalawalkar)

अंकिताने तिच्या मेहंदीपासून ते हळद, लग्न, रिसेप्शन ते अगदी सासरी तिचं झालेलं स्वागत,या सर्वांचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

कोकणातील कुडाळ येथील लक्ष्मी-नारायण मंदिरात अंकिता व कुणालचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला.

अंकिता व कुणालच्या लग्नसोहळ्याला कलाकार आणि राजकारणातील मंडळींनी खास उपस्थिती लावली . त्यानंतर अलिबागमध्ये अंकिता-कुणालचे लग्नाचे रिसेप्शन झाले.

अंकिताने नुकतेच रिसेप्शनचेकाही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.

रिसेप्शन सोहळ्यासाठी अंकिताने सोनेरी डिझायनर साडी नेसली.

तर कुणालने यावेळी काळ्या रंगाचा इंडो-वेस्टर्न सूट परिधान केला. दोघेही खूप सुंदर आणि एकत्र प्रचंड खुश दिसत होते.

Favorite reason to smile... अशी कॅप्शन देत अंकिताने हे फोटो सर्वांसोबत शेअर केले.