
'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावकर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकतंच ती अक्कलकोट इथं स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेली होती. यानंतर तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.

अंकिताने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'काल स्वामींचं दर्शन घेऊन आलो. मनात खूप गोष्टी होत्या. सतत वाटायचं की खोटं वागणाऱ्यांसोबत चांगलं का होतं? आपण खरं वागून चुकीचे का वाटतो? आपल्याला मुद्दाम चुकीचं का दाखवलं गेलं?'

'पण अक्कलकोट हे एक असं स्थान आहे जिथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. एक कायम लक्षात ठेवा 'कर्माच्या हिशोबात उशीर होतो, चूक होत नाही. बाकी तो बघता, तेचो लक्ष आसा,' असं तिने पुढे लिहिलंय.

या पोस्टमध्ये अंकिताने होणारा पती कुणाल भगतला टॅग करत लिहिलं, 'तू माझ्या कर्माचं एक फळ'. अंकिता आणि कुणाल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अक्कलकोटला या दोघांच्या लग्नाची पत्रिकाही ठेवण्यात आली.

अंकिताचा होणार पती कुणाल हा संगीत दिग्दर्शक असून 'आनंदवारी' या म्युझिक अल्बमसाठी दोघांनी एकत्र काम केलं होतं. फेब्रुवारी महिन्यातच हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय.