Gokul: गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणसंग्राम, सतेज पाटलांचा संघर्ष मोर्चा, दसरा चौकात जनसागर

Gokul: गोकुळच्या सत्तासंघर्षावरून सुरू झालेला हा वाद आता न्यायालयीन लढाईसोबतच रस्त्यावरही पोहोचला आहे. त्यामुळे न्यायालयात या अध्यादेशाबाबत काय निर्णय होतो आणि गोकुळच्या सत्तेचे गणित कोणाच्या बाजूने झुकतं, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

| Updated on: Nov 09, 2026 | 11:49 AM
1 / 5
Gokul: कोल्हापूरच्या राजकारणात सध्या गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. गोकुळ दूध संघावर चार स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज (9 नोव्हेंबर) सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात 'संघर्ष मोर्चा' काढण्यात आला.

Gokul: कोल्हापूरच्या राजकारणात सध्या गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. गोकुळ दूध संघावर चार स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज (9 नोव्हेंबर) सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात 'संघर्ष मोर्चा' काढण्यात आला.

2 / 5

ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या या मोर्चात समविचारी आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चासाठी दसरा चौकात मोठी गर्दी जमली होती. हातात काळे झेंडे घेऊन नागरिकांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. कोल्हापुरातील वकिलांनीही या संघर्ष मोर्चाला पाठिंबा दिला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

3 / 5

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकल्या होत्या. तर महायुतीच्या पॅनेलला 12 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे गोकुळमध्ये समविचारी आघाडीला बहुमत मिळाले होते. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीवेळी महायुतीच्या 12 संचालकांनी अनुपस्थित राहिल्याने आवश्यक कोरम पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे अध्यक्ष निवडीचा पेच निर्माण झाला. त्यानंतर सतेज पाटील गटाने स्वतंत्र बैठक घेत शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड जाहीर केली. या निवडीवरूनही कायदेशीर वाद निर्माण झाला.

4 / 5

गोकुळमधील सत्तेचा पेच सोडवण्याऐवजी राज्य सरकारने दूध संघाच्या संचालक मंडळावर चार स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्याने वाद आणखी चिघळला. विशेष म्हणजे, या सदस्यांना मतदानाचा अधिकारही देण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकीत 13 जागा मिळवलेल्या समविचारी आघाडीच्या बहुमतावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारचा हा निर्णय गोकुळचा ताबा मिळवण्यासाठी असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे.

5 / 5

या अध्यादेशाला समविचारी आघाडीकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आव्हानही देण्यात आलं आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात सतेज पाटील यांनी रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानुसार आज संघर्ष मोर्चाचं आयोजन करण्यात आले. या मोर्चात समविचारी आघाडीच्या नेत्यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले. हातात काळे झेंडे घेऊन सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. कोल्हापुरातील वकिलांनीही मोर्चाला पाठिंबा दिल्याने आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झालं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us