
कोल्हापुरात झालेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या महापुरामूळे कोल्हापुरातील प्रमुख रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

81 पैकी तब्बल 35 हून अधिक प्रभागातील रस्त्यांना पावसाच्या पाण्याचा फटका बसलाय.

पापाची तिकटी, गंगावेश, बिंदू चौक अशा सर्वच भागात या दुर्दशा झालेल्या रस्त्यांचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागतोय...

अजूनही अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी मुळे खड्ड्यात पाणी साचून आहे. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने छोटे मोठे अपघात देखील होत आहेत.

विशेष म्हणजे खराब झालेल्या अनेक भागातील रस्ते हे काही महिन्यापूर्वीच केले होते.. त्यामुळे या रस्त्याच्या दर्जावर देखील आता प्रश्नचिन्ह उभे राहिलय.. कोल्हापुरातील खड्डेमय रस्त्यामुळे नागरिक मात्र पुरते वैतागून गेले आहेत... वाहन चालकांच्या पाठणीची हाडं त खिळखिळी झालीत...